मुंबई : राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती असतानाच निवडणूक आयोगाने दिलासा देत विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला असून 21 मे रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. राज्यावर करोनाचं संकट असतानाच राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती होती. पण निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा दिला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर दिल्लीत निवडणूक आयोगाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी निवडणूक आयोगाने राज्यात 27 मे आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी म्हणून राज्य मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस केली होती. राज्यपालांनी ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर तीन आठवडे निर्णयच घेतला नाही. राज्यपाल अनुकूल प्रतिसाद देत नसल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली व तोडगा काढण्याची विनंती केली होती.
Elections to the Legislative Council (MLCs) in Maharashtra will be conducted on May 21 in Mumbai: Election Commission of India (ECI) https://t.co/fWQZXcNola
— ANI (@ANI) May 1, 2020
महत्वाच्या घडामोडी-
संजय राऊत यांनी मानले केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार
उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावला बिहारचा आमदार; ऑडिओ क्लिप व्हायरल
“एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये”
… तर आता मुख्यमंत्री आमदार होणार म्हणून अभिनंदन करायची वेळ आली- निलेश राणे