Home महाराष्ट्र … तर आता मुख्यमंत्री आमदार होणार म्हणून अभिनंदन करायची वेळ आली- निलेश...

… तर आता मुख्यमंत्री आमदार होणार म्हणून अभिनंदन करायची वेळ आली- निलेश राणे

मुंबई : राज्यावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वावरून राजकीय अस्थिरतेचं सावट सरकारवर फिरू लागलं आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याचा ठराव दोन वेळा राज्यापालांकडे पाठवून सुद्धा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. यावरून आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

अगोदर आमदार मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करायचे. आता मुख्यमंत्री आमदार झाल्यावर अभिनंदन करायची पाळी आली. अगोदर मुख्यमंत्री आमदार निवडून आणायचे, आताच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःआमदार होता येत नाही, असं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, 2 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहावर निवडून जाणं आवश्यक आहे. त्यांचा सहा महिन्यांचा कालावधी येत्या 27 मे रोजी पूर्ण होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मागच्या दारानं सरकार स्थापन करण्यात भाजपला कसलाही रस नाही- देवंद्र फडणवीस

तो गेलाय आणि मी उध्वस्त झालोय…,अमिताभ बच्चन यांच भावूक ट्विट

अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन; वयाच्या 68 वर्षी घेतला अखेरचा श्वास

इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- उद्धव ठाकरे