आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे अडीच वर्ष तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. यावरुन भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
पैसे देऊन मातोश्री २ चं बेकायदा बांधकाम नियमित करण्यात आल्याचा आरोप करत “माझ्याकडे सगळे पुरावे असून मी ईडीपर्यंत सगळी माहिती पोहोचवली आहे”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : मनसेच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळला; राज ठाकरे स्टेजवर असतानाच घडला प्रकार
शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आले आहेत. त्यांनी एक मातोश्री दुरुस्त केली, मातोश्री पार्ट टू बांधली. आम्ही काही म्हणालो का? भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना मातोश्री दोनचं बेकायदेशीर बांधकाम पैसे देऊन नियमित केलं”, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करा; किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी व्हायला हवी- राज ठाकरे