Home महाराष्ट्र आदित्य ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका

आदित्य ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आम्ही 2024 मध्ये सत्तेत येऊ असं विधान केलं होतं. यावरून आता भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

2024 ला सत्तेत येऊ असं आदित्य ठाकरे यांनी झोपेतून उठल्यासारखं विधान केलं आहे. मला वाटतं आदित्य यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या स्मार्ट सिटीच्या कामाचे आदित्य यांनी उद्घाटन केलं, त्याच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाला त्यांचे वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मंत्र्याने विरोध केला होता, अशी टीका रवींद चव्हाण यांनी केली.

हे ही वाचा : महाराष्ट्राच्या इतिहासात उद्धव ठाकरे यांच्या इतका लाचार मुख्यमंत्री झाला नाही- नारायण राणे

दरम्यान, स्मार्ट सिटी ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आदित्य यांनी किमान मोदींचा उल्लेख करायला हवा होता, असा टोलाही रवींद्र चव्हाण यांनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर नितेश राणेंची बिनविरोध निवड

राष्ट्रवादीचा भाजपाला धक्का; माजी नगराध्यक्षासह भाजपच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

संजय राऊत म्हणाले, सोमय्या वेडा झालाय; आता किरीट सोमय्या, म्हणतात…