आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : बाॅलिवूडचे प्रसिद्ध गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबतची बातमी दिली आहे.
दरम्यान, बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली. तसेच 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ‘भंकस’ नावाचे त्यांनी शेवटचे बॉलिवूड गाणे गायलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
हिंदूहृदयसम्राट नको मराठी हृदयसम्राट म्हणा; घाटकोपरमधील घोषणाबाजीवरून राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
ईडीची भिती दाखवता काय?; पण लक्षात ठेवा, आम्ही…; गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा