मुंबई : महाराष्ट्रात जनमत भाजपविरोधी आहे. सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही, असं ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
या सदस्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणुका घेतल्या तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने त्या व्यक्तीचा पराभव करण्याची काळजी या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जाईल याचा मला विश्वास आहे, असंही पवार म्हणाले आहेत.
या सदस्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणुका घेतल्या तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने त्या व्यक्तीचा पराभव करण्याची काळजी या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जाईल याचा मला विश्वास आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 23, 2019
अजित पवार फुटून जातील असं कधीही वाटलं नव्हतं. फाटाफुटीचं हे राजकारण मी खूप पाहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकार स्थापनेचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असंही शरद पवार यांनी म्हटंल आहे.
दरम्यान, भाजपला 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यावर बोलताना शरद पावर म्हणाले की 30 नोव्हेंबरला पुढचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतील.