मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. दुर्धर असा कॅन्सर झाला असून सुद्धा न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इरफान खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. दुर्धर असा कॅन्सर झाला असून सुद्धा न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 29, 2020
महत्वाच्या घडामोडी-
इरफान यांच्या निधनानंतर युवराज सिंगचं भावूक ट्विट
मुख्यमंत्र्यानी राजीनामा देऊन बांगड्यांच दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे
अभिनेता इरफान खानचं निधन; 54 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारच्या कारभारावर टिका; म्हणाले…