Home महाराष्ट्र कर्नाटक सरकारचा हिजाबला परवानगी देण्यास नकार; तर ओवेसी म्हणतात…

कर्नाटक सरकारचा हिजाबला परवानगी देण्यास नकार; तर ओवेसी म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बेंगलुरु : कर्नाटकमधील हिजाब विरुद्ध भगवा हा वाद चांगलाच पेटला आहे. शिवमोग्गा येथील शासकीय पदवी महाविद्यालयात मंगळवारी दोन गटात दगडफेकीची घटना घडली. या घटनेनंतर दोन हिजाबच्या वादाचे पडसाद इतर राज्यांतही उमटू लागले आहेत. वाढता विरोध पाहून कर्नाटक सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

हे ही वाचा : …तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यातच राहणार; नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला

हिजाब प्रकरणावर आज सलग दुसऱ्या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली, मात्र कोणताही निर्णय झाला नाही. न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात यावे, असे या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाने सांगितले.

दरम्यान, एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसी यांनीही हिजाबचे समर्थन केले आहे. मी दुआ करतो की, कर्नाटकात हिजाबच्या अधिकारासाठी लढणाऱ्या बहिणींना यश मिळो. कर्नाटकात घटनेची पायमल्ली करण्यात येत आहे.  असं ओवेसी  म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा फक्त शिवसेना आहे, दुसरं कोणी नाही”

काँग्रेसचं काळं कुत्रं जरी आलं तर झोडून काढू; भाजपच्या ‘या’ नेत्याचं वादग्रस्त विधान

“रायगडमध्ये शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; सरपंच, उपसरपंचासह सदस्यांनी हाती बांधलं शिवबंधन”