आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा (ईडीच्या) सूरू असलेल्या कारवाईवरून केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.
शिवसेना नेते आणि त्यांच्या नातेवाईकांना केंद्रीय संस्थांकडून टार्गेट केलं जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं काम केलं जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी यावेळी केला.
हे ही वाचा : काँग्रेसचं काळं कुत्रं जरी आलं तर झोडून काढू; भाजपच्या ‘या’ नेत्याचं वादग्रस्त विधान
ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाता येणार नाही., हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. तसेच ईडीचा नकाब उतरवल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत दादागिरी चालणार नाही, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
“रायगडमध्ये शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; सरपंच, उपसरपंचासह सदस्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून भाजपाचे छुपे राजकारण; किशोरी पेडणेकरांची टीका
अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप