आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोरोना पसरण्यास काँग्रेस कारणीभूत असल्याचं संसदेत म्हटलं होतं. तसेच कोरोनाच्या संकटात काँग्रेसने मुंबईतील यूपी, बिहारींना त्यांच्या गावाला जाण्यासाठी पैसे दिले. गावाला जा आणि कोरोना पसरवा, असं काँग्रेसचे लोक म्हणत होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत केला होता. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.
कोरोना काळात राज्य सरकार मजुरांसोबत, गरीबांसोबत उभे राहिले. आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादला. नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला. ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.
हे ही वाचा : “त्रिपुरात भाजपला मोठे धक्के, ‘या’ 2 मोठ्या नेत्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश”
जेंव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना पसरणार नाही असं सांगितलं होतं. नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आलं. ट्रम्प यांना प्रोत्साहन दिलं आणि तेथून देशभरात कोरोना पसरला, असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”
ज्या किराणा दुकानात वाईन विक्री केली जाईल, ते दुकान मी स्वत: बंद करणार- सुजय विखे पाटील
कुठलंही काम शिल्लक ठेवणं, हे आमच्या रक्तात नाही- विश्वजीत कदम