Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारच्या कारभारावर टिका; म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारच्या कारभारावर टिका; म्हणाले…

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. राज्यात अघोषित आणीबाणीसदृश आणि अभूतपूर्व परिस्थिती असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे एक पत्र सोपवलं.

माध्यमांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात दबाव तंत्राचा वापर चालाला आहे. पहिल्यांदा ज्या प्रकारे एबीपी माझाच्या वार्ताहराला ज्याप्रमाणे आटक करण्यात आली त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार अर्नब गोस्वामी यांना चौकशी साठी 12 तास बसवून ठेवण्यात आलं. अशा प्रकारे दबाव तंत्राचा वापर चालला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहेत. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थ्यांनी सांगितलं असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्ध राज्य सरकारला याबद्दल जाब विचारला आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

महत्वाच्या घडामोडी-

“माझ्याकडे सगळी माहिती आहे, पण…”; किम जोंग यांच्या प्रकृतीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; घेतली राज्यपालांची भेट

उत्तर प्रदेशातील साधू हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन; म्हणाले…

लॉकडाउन हळूहळू शिथिल झालं पाहिजे- सुप्रिया सुळे