आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलो. हा आपल्या स्पर्धेमध्ये असता कामा नये. म्हणून मला बाजूला करण्यात आलं, असं म्हणत माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. गुरुवारी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.
“गेल्या ७० वर्षाच्या राजकीय जीवनात खान्देशचा मुख्यमंत्री झाला नाही. खान्देशवाशीयांना असं वाटतं की, मराठवाडयाचे दोन- तीन मुख्यमंत्री झाले, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई येथील मुख्यमंत्री झाले. पण खान्देशमधील झाले नाहीत. अन् एखादा माणूस पोहचला तर त्याला होऊ दिले नाही,” असं म्हणत खडसेंनी खंत व्यक्त केली.
हे ही वाचा : अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मुंबईत ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात’; आता किशोरी पेडणेकर म्हणतात…
“देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी महानगर पालिकेत झालेला भ्रष्टाचार हा विधानसभेत मांडावा. आपल्या माणसाची चौकशी मागणी करत नाहीत. पण, इतरांकडे ते बोट दाखवतात. हे योग्य नाही. भ्रष्ट्राचारविरोधात भांडायचे असेल तर आपला असो वा परका जे घडलेलं आहे त्याच्या विरोधात चौकशी, कारवा ची मागणी केली पाहिजे,” असंही एकनाथ खडसेंनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या
नितेश राणे प्रकृती बिघडली; रुग्णालयात केलं दाखल
“जिथं अन्याय तिथं रूपाली ताई, बंड्या तात्या कराडकर विरूद्ध पोलिसांत केला गुन्हा दाखल”