आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या दारू पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं. बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त विधानावर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : “गोव्यात शिवसेना सुसाट, ‘या’ प्रसिद्ध फुटबाॅलपटूनं आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”
मला वाटतं स्त्रियांनी आपल्या देशात अधीच खूप त्रास सहन केला आहे. त्यामुळे स्त्रियांवर टिप्पणी करणं आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे. त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आपल्या देशात नेहमी हेच होतं. कोणी काही बोललं की त्यावर आपण आंदोलन करतो. पण या गोष्टी मानसिकतेशी संबंधित आहे. आपणच ठरवलं पाहिजे काय बोलावं आणि काय बोलू नये. स्त्रियांच्यांवर अत्याचार होतात तेव्हाच आपण बोलतो किंवा कारवाई करतो. पण आता आपल्याला आपल्या मानसिकतेत रिव्हॉल्यूशनरी चेंज आणावा लागेल, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
दरम्यान, बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. अनेक ठिकाणी बंडातात्यांच्या पुतळ्याचं दहन केलं जात आहे. हा वाद वाढत चालल्याने बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
बंड्या तात्यांनी महिलांची तात्काळ माफी मागावी, अन्यथा खळखट्याक अटळ; रूपाली पाटलांचा इशारा
“जम्मू काश्मीरमध्येही शिवसेनेची क्रेझ, शेकडो मुस्लिम बांधवांनी हाती बांधलं शिवबंधन”
‘…अखेर ‘बोक्या’ शरण आला’; शिवसेनेची नितेश राणेंवर टीका