मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच नाही तर देश लॉकडाऊनमध्ये आहे. यावर सध्या लॉकडाउन उठवण्यासाठी घाई करणं हिताचं नाही. लॉकडाउन हळूहळू शिथिल झालं पाहिजे, असं मत राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.
सध्या लॉकडाउनमध्ये कशी शिथिलता आणायची यावर केंद्र आणि राज्य सरकार विचार करत आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात काही बदल घडवावे लागणार आहेत. लॉकडाउन शिथिल होण्याची मीदेखील वाट पाहत आहे. आपल्याला मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची सवय सुरूच ठेवावी लागणार आहे. त्याचा वापर करून आपल्याला कामाला जावं लागणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, आपल्याला मौजमजेसाठी नाही तर अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करणं आवश्यक आह, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे
किशोरीताई यांनी आपल्या समोर खरा आदर्श निर्माण केला- धनंजय मुंडे
रितेश देशमुखने केलेल्या कौतुकावर निलेश राणेंच टिकास्त्र; म्हणाले…
…असा उपदेश मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना केला तर बरं होईल- आशिष शेलार