आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक मुंबईच्या एमआयजी क्लब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांना काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याचं समोर आलं आहे. महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे. एप्रिलमध्ये निवडणुका ग्रहित धरुन कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
हे ही वाचा : नितेश राणेंना मोठा धक्का; ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी, सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचा निकाल
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मनसे भाजप युतीच्या चर्चा होत्या. यावरून राज यांनी, आपण एकटे लढण्याची तयारी करावी, असे आदेश मनसे नेत्यांना दिले आहेत. तसेच आपली स्वबळाची तयारी असली पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटल्याचं समोर आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नितेश राणेंना मोठा धक्का; ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी, सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचा निकाल
‘…म्हणून शिवसेनेने सावरकरांचा फोटो लावला नाही’; भाजपचा शिवसेनेवर घणाघात
राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक; महापालिका निवडणुकीची रणनिती ठरणार