आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नितेश राणे यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे 4 फेब्रुवारीपर्यंत नितेश राणेंचा मुक्काम कोठडीत असणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे.
हे ही वाचा : ‘…म्हणून शिवसेनेने सावरकरांचा फोटो लावला नाही’; भाजपचा शिवसेनेवर घणाघात
नितेश राणेंना संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयानं याआधीची जामीन अर्ज देणं फेटाळलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवाणी न्यायालयात नितेश राणे शरण गेले होते. त्यानंतर याप्रकरणी युक्तिवाद झाला. कणकवली पोलिस स्टेशनमध्ये आता आमदार निलेश राणे यांना नेलं जाणार आहे.आता पोलिस कोठडीत त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. आता नितेश राणे 4 फेब्रुवारीनंतर नितेश राणे जामीनासाठी अर्ज करु शकतात.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचा गंभीर आरोप संतोष परब यांनी केला होता. संतोष परब हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष असलेल्या सतिश सावंत यांचे निकटवर्तीय आणि खंदे समर्थक असल्याचं समोर आलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक; महापालिका निवडणुकीची रणनिती ठरणार
“आगामी महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार-आदित्य ठाकरे पुणे दाैऱ्यावर, युती होणार?”
राज्यपालांनी 12 आमदारांचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचा नागरी सत्कार करू- संजय राऊत