Home पुणे “आगामी महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार-आदित्य ठाकरे पुणे दाैऱ्यावर, युती होणार?”

“आगामी महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार-आदित्य ठाकरे पुणे दाैऱ्यावर, युती होणार?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर जोरदार कसली आहे.

शिवसेनेनंदेखील ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसांत ते पुणे येथे येऊन आढावा घेतील. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील पुणे दाैरा करून निवडणूकीचा आढावा घेणार आहेत.

हे ही वाचा : राज्यपालांनी 12 आमदारांचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचा नागरी सत्कार करू- संजय राऊत

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, सध्यातरी शिवसेनेनं स्वबळाची तयारी सुरु केली आहे. मात्र युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी देखील स्वबळाची तयारी केलेली आहे. बैठकीत अजित पवार स्वबळाचा नारा देणार की पुण्यात युती होणार ? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल”

राष्ट्रवादीलाच खिंडार पाडल्याशिवाय राहणा नाही; भाजप नेत्याचं राष्ट्रवादी नेत्याला जोरदार प्रत्युत्तर

अर्थसंकल्प नाही हा तर निवडणूक संकल्प; जयंत पाटलांची टीका