मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नायर रुग्णालयात परिचारिकेच्या वेषात जाऊन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढवला. महापौरांनी फेसबुक पेजवर फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली. त्यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी किशोरी पेडणेकर यांचं कौतुक करत त्यांचं आभार मानलं आहेत. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या महापौर पदाचा मान राखत, कोरोनाच्या युद्धात लोकांची सेवा करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या किशोरीताई पेडणेकर यांनी आपल्या समोर खरा आदर्श निर्माण केला आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
किशोरी ताई तुमचे आभार
मुंबई महानगर पालिकेच्या महापौर पदाचा मान राखत, या #COVID19 च्या युद्धात लोकांची सेवा करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या सौ. किशोरीताई पेडणेकर यांनी आपल्या समोर खरा आदर्श निर्माण केला आहे.@mybmc @KishoriPednekar https://t.co/jcPIlEHz13
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 27, 2020
महत्वाच्या घडामोडी-
रितेश देशमुखने केलेल्या कौतुकावर निलेश राणेंच टिकास्त्र; म्हणाले…
…असा उपदेश मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना केला तर बरं होईल- आशिष शेलार
…म्हणून आपण मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे- रितेश देशमुख
धान्य वाटपावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच विरोधकांना उत्तर; म्हणाले…