Home महाराष्ट्र “औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये”

“औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून नवीन वादाला सूरूवात झाली आहे. भाजप आणि शिवसेना हा पुतळा उभारण्यासाठी आग्रही असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा मात्र हा पुतळा उभारण्यास विरोध दर्शवला आहे. यावरून आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.

औरंगाबाद शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणारच. यासाठी मी पुढाकार घेईन, असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी यावेळी केलं. सिल्लोड नगरपरिषदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात ते बोलत होते.

हे ही वाचा : काँग्रेसला मोठं खिंडार; अजित पवारांच्या उपस्थितीत 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवणारच. तसेच इम्तियाज जलील यांनी विरोध करू नये, असं मी आवाहन केलं आहे. तसेच औरंगाबादेत हा पुतळा बसवताना मी स्वतः पुढे असेन, असं सत्तार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“सामाजिक कार्यकर्ते, मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेचे संस्थापक डाॅ.अनिल अवचट यांचं निधन”

नगरपंचायतीमधील पराभवानंतर गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचलं; म्हणाले, “ज्याच्यात दम आहे तो…”

ध्वजारोहणावेळी आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केला- अॅ़ड. जयश्री पाटील