मुबंई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राजकीय आरोपप्रत्यारोपही जोरात सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पुन्हा राजकारण करण्याची ही वेळ नाही, असं सांगितलं आहे, त्यावरुन भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना व्हिडीओच्या माध्यमातून एक विनंती केली आहे.
मुख्यमंत्री, कोरोनाच्या लढाईत विरोधीपक्षासह महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहेच. आपण फेसबुकवरुन राजकारण करु नका, असा जो उपदेश केलात तो सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना केलात तर बरं होईल. राज्यपालांवर टीका, बांद्र्यातील घटनेनंतर युवराजांचे विधान.. हे थांबवलेतर बरे होईल, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
मा. मुख्यमंत्री, कोरोनाच्या लढाईत विरोधीपक्षासह महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहेच. आपण फेसबुकवरुन राजकारण करु नका, असा जो उपदेश केलात तो सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना केलात तर बरं होईल. राज्यपालांवर टीका, बांद्र्यातील घटनेनंतर युवराजांचे विधान.. हे थांबवलेतर बरे होईल. pic.twitter.com/eQjg5Phlya
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 26, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…म्हणून आपण मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे- रितेश देशमुख
धान्य वाटपावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच विरोधकांना उत्तर; म्हणाले…
मुख्यमंत्र्यांनी मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले…
काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध झालाय; संदिप देशपांडेंचं राऊतांवर टिकास्त्र