आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबईच्या मालडमधील एका क्रिडा संकुलाच्या नावावरून वाद पेटलाय. क्रिडा संकुलाला टिपू सुलतान नाव दिलं आहे. या नावाला भाजपसह बजरंग दलाने जोरदार विरोध केला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे.
मुंबई महापालिका टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देऊन त्यांचं महिमामंडन करत आहे. हे त्वरीत थांबवलं गेलं पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, यावरुन अस्लम शेख यांनी ना देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार पलटवार केलाय.
हे ही वाचा :
भाजपने रस्त्यांना टिपू सुलतान नाव दिलं, आता भाजप केवळ निवडणुका आल्यात म्हणून राजकारण करत आहे. ज्या भाजप नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का? असा सवाल अस्लम शेख यांनी फडणवीसांना विचारला आहे.
दरम्यान, टिपू सुलतानानेने हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही. त्यांचं नाव मैदानाला देणं अयोग्य आहे. अत्याचार करणाऱ्याचं महिमामंडन करण्याचं काम होत आहे. हा निर्णय रद्द केला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
“मुंबई हादरली; वांद्रयात चार मजली इमारत कोसळली, 15 जण जखमी”
धनंजय मुंडेंसमोरच आमदार चढले झाडावर; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या; चंद्रकांत पाटलांचा टोला