“सुरक्षा कपातीसारख्या राजकीय उठाठेवी करण्यापेक्षा जनतेच्या हिताकडं लक्ष द्या”

0
375

रायगड :  विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अधक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते रायगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

हा खरं म्हणजे सूड भावनेने घेतलेसुला निर्णय आहे. राजकीय नेत्यांना दिलेली सुरक्षा सविंधानानं दिलेला प्रोटोकॉल आहे. देवेंद्र फडणवीस किंवा मी सुरक्षा मागितली नव्हती. आतापर्यंत सुरक्षेच्याबाबतीत राजकीय निर्णय झाला नव्हता, असं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.

आमची सुरक्षा काढली तरी हरकत नाही. आम्ही जनतेत फिरत राहणार, आमच्यावर दबाव आणला तरी फरक पडणार नाही. मात्र, राज्यातील जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं, सुरक्षा कपातीसारख्या राजकीय उठाठेवी करण्यापेक्षा जनतेच्या हिताकडं लक्ष द्यावं, असंही प्रविण दरेकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

नितेश राणे हे हँग आहेत, त्यांना काही कळत नाही; शिवसेनेची टीका

MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर; ‘या’ तारखेला होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा

योगी की मौत सुनिश्चित हैं; आम आदमी पक्षाच्या सोमनाथ भारती यांचं वक्तव्य, पहा व्हिडीओ

“मुलगी झाली हो! विरूष्काने दिली Good News”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here