Home महाराष्ट्र ‘…तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी’; संत एकनाथ मंदिराच्या खासगीवरून मनसे आक्रमक

‘…तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी’; संत एकनाथ मंदिराच्या खासगीवरून मनसे आक्रमक

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत. नाट्यगृहासमोर आज मनसेने आंदोलन केलं.

महानगरपालिकेने या नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवला असून मनसेकडून या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. मात्र महापालिकाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने पुन्हा एकदा निदर्शनं करण्यात आली.

हे ही वाचा : “मिरच्या झोंबल्या, बांबू लागला, म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना?”

गेल्या काही वर्षांपासून नूतनीकरण करण्याच्या प्रक्रियेसाठी हे नाट्यगृह बंद आहे. मागील वर्षात याचे नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून यासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले. एवढा खर्च झाल्यानंतर आता हे नाट्यगृह खासगी कंत्राटदाराला चालवण्यासाठी देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यावर मनसेने आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, खासगीकरण करायचंच होतं तर जनतेचा 10 कोटी रुपयांचा निधी त्यासाठी का वापरला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“रूपाली पाटील ठोंबरे यांच्यावर राष्ट्रवादीने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

शरद पवारांना कोरोणाची लागण; पंतप्रधान मोदींकडून प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

“…त्यामुळे शिवसेनेने भूमिका घेतली आणि भाजपाला बाजूला केलं”