मुंबई : राज्यात करोनाचा प्रदुर्भाव वाढक आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. मात्र, करोनासंदर्भात निर्णय घेण्यात सरकार अपयशी ठरलं असल्याची आणि रेशनच्या धान्य वाटपावरून सरकारवर टीका होत आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.
केंद्राचं पथक पाच सहा दिवसांपासून आपल्याकडं मुक्काम ठोकून आहे. मुंबई, पुण्यात हे पथक आल्यानंतर काहीजणांनी मला सांगितलं. ‘बघा, केंद्राचं पथक आलेलं आहे. दाल में कुछ काला हो सकता है?’ मी त्यांना सांगितलं की, आम्ही त्यांच्याकडूनच डाळ मागतोय. कारण अजूनही अन्न सुरक्षा योजनेतंर्गत धान्य वाटायचं आहे. त्यात फक्त तांदूळ आहे. गहू आणि डाळ हवी आहे. दाल में काला बाद में, पहले दाल तो आने दो. डाळ आल्यानंतर त्याच्यामध्ये काळंबेर आहे की नाही, ते नंतर बघू, पण आधी डाळ आली पाहिजे, गहू आला पाहिजे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी लॉकडाउनमुळं गुणाकारात वाढणाऱ्या या संकटावर मात करण्यात आपण काही प्रमाणात यशस्वी ठरलो आहोत. आरोग्य कर्मचारी, पोलीस अशा कोणावरही पटकन संशय व्यक्त करण्याआधी त्यांच्या परिस्थितीचा विचार करा. सध्या हे लोक खूपच तणावाखाली काम करीत आहेत,” असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्र्यांनी मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले…
काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध झालाय; संदिप देशपांडेंचं राऊतांवर टिकास्त्र
रामदास आठवलेंनी कवीता करत केली राज्य सरकारकडे ‘ही’ मागणी
राज ठाकरेंच्या ‘त्या’ सूचनेला छगन भुजबळांच समर्थनं; म्हणतात…