आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष तसेच मनसेच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी काही दिवसांपू्र्वी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटील राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर रूपाली पाटील यांना मोठी जबाबदारी मिळणार, अशा चर्चा सूरू होत्या. याबद्दल आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
हे ही वाचा : शरद पवारांना कोरोणाची लागण; पंतप्रधान मोदींकडून प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार
दरम्यान, रूपाली पाटील यांनी पुणे येथील कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी सायंकाळी भेट घेतली. या भेटीत रूपाली पाटील यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी त्यांना दिली असल्याची माहिती समोर आली आहे. रुपाली पाटील यांना पक्षाची राज्य पातळीवरील जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच येत्या दोन दिवसात रूपाली पाटील यांनी पक्षाचे अधिकृत पत्र त्यांना देण्यात येईल, अशी माहितीही समोर आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“…त्यामुळे शिवसेनेने भूमिका घेतली आणि भाजपाला बाजूला केलं”
राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचं वादळ; अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ
अखेर मुंबई महापालिकेसाठी मनसे-भाजप एकत्र?; युती होणार?; चर्चांना उधाण