Home महाराष्ट्र भाजप हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत- उद्धव ठाकरे

भाजप हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत- उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, अशी टीका भाजप नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. भाजपच्या या टीकेला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठं पद?; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं त्यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलं नाही. वापरायचं आणि टाकून द्यायचं हा भाजपचा स्वभाव आहे. हे हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता हवी म्हणून मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युत्ती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटाव या वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूंशी युती, हे आपलं हिंदुत्व नाही”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्य सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सरकार बरखास्त करा; नाना पटोलेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

बाळासाहेब ठाकरे आज असते तर…; संजय राऊतांनी दिला आठवणींना उजाळा

ठाकरे सरकार बरखास्त करा; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी