Home महत्वाच्या बातम्या ओबीसी विषयावर सरकार फक्त खोटं बोलत आहे; चद्रंशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडी सरकारवर...

ओबीसी विषयावर सरकार फक्त खोटं बोलत आहे; चद्रंशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भंडारा : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात  सोमवारी महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. अशातच  ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

ओबीसी समाजाचा एम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी राज्य मागास्वर्ग आयोगाने तज्ञांच्या मदतीने प्रश्नावली तयार केली. पुणे येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत इम्पेरीकल डाटाच्या प्रश्नावलीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.

हे ही वाचा : “पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही, फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल”

नवीन एम्पेरिकल डेटा तयार करायचा होता. मात्र, या लोकांनी ओबीसी समाजाची दिशाभूल केली. केंद्र सरकारकडे बोट दाखवत राहिले. 2011 चा जनगणनेचा डेटा हा 2011 च्या जिल्हा परिषदेच्या कामाचा नव्हता. नवीन डेटा तयार करायचा होता. पण या सरकारनं ते काम केलं नाही. महाविकास आघाडी सरकार फक्त खोटं बोलत आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

दरम्यान, आपण सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की तीन महिन्याच्या आत डेटा तयार करावा आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी विनंतीही कोर्टाला केल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार, तब्बल ‘इतक्या’ कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

महिलांसोबत गैरवर्तनाच्या आरोपांवर अभिनेते किरण माने यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“छत्रपतींचा पुतळा उभा करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नव्हे, तर त्यांच्या आदर्शावर चला”