आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : औरंगाबादेत शुक्रवारी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून शिवसेना आणि भाजप नेत्यांनी एकत्र येत पतंगबाजीचा आनंद लुटला. भाजप नेत्याने आयोजित केलेल्या या पतंगबाजीच्या कार्यक्रमात विविध पक्षांच्या नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना मात्र उधाण आले.
मकरसंक्रांतीचे औचित्य साधून भाजपचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सदस्य अनिल मकरिये यांनी निवासस्थानी पतंगबाजीचे आयोजन केले. या कार्यक्रमात माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींनी उपस्थिती लावली.
हे ही वाचा : भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, त्यामुळे…; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पतंग उंच हवेत उडवला, तर चंद्रकांत खैरेंच्या पतंगाची चक्री आपल्या हाती पकडत भाजप नेते अनिल मकरियेदेखील वेगळेच संकेत देत होते. अर्थ काहीही निघोत, एरवी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन संक्रांतीचा आनंद लुटला, ही बातमी औरंगाबादकरांसाठी सुखावह आहे.
दरम्यान, भाजपचे आमदार अतुल सावे, आ. किशनचंद तनवामी, मनपातील माजी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, भाजयुमोचे शहराध्यक्ष राजगौरव वानखेडे आदींसह पदाधिकाऱ्यांनी पतंगबाजीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
महत्वाच्या घडामोडी –
आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची