Home महाराष्ट्र दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार?; इम्तियाज जलील यांचा...

दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार?; इम्तियाज जलील यांचा सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : राज्य मंत्रीमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला. महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात, असा निर्णय राज्य सरकारनं पार पडलेल्या बैठकीत घेतला. या निर्णयावरून एमआयएमचे नेते व औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली.

“सरकारला जर मराठी वर प्रेम असेल तर सरकारी खर्चातून दुकानाच्या पाट्या बदलून द्याव्यात. दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा : ‘…तर आता आम्हीच पुकारू बंड’; चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला इशारा

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावरून, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांनीही राज्य सरकारने मराठी फॉन्टच्या साईजबद्दल बळजबरी करु नये, अशी विनंती केली आहे. तसेच दुकानांची नावे मराठीतच असावेत याबाबत कोणताही वाद नाही. मात्र मराठी अक्षरांचा फॉन्ट इतर भाषांपेक्षा मोठा असावा या सक्तीबाबत आमचा आक्षेप आहे, असं विरेन शहा म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

अजित पवारांच्या शब्दाला मंत्रीमंडळात किंमत आहे की नाही?; भाजपचा सवाल

“…तर मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढेन”

“मोठी बातमी! मनसे आमदार राजू पाटील यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण”