आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : शिवशक्ती सेना पक्षाच्या संस्थापक करूणा मुंडे यांनी आगामी काळात परळीतून राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आमदारकीची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. पुण्यात रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेमध्ये प्रवेश केला. त्यांना संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
हे ही वाचा : “मोठी बातमी! मनसे आमदार राजू पाटील यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण”
“माझी घोषणा वेगळी आहे. ‘कार्यकर्ता आगे बढो, करूणा धनंजय मुंडे त्यांच्यासोबत आहे’ अशी माझी घोषणा आहे. मी माझ्या लोकांची नेता झाली आहे, तर मी त्यांचा झेंडा उचलेल. मी आत्ता निवडणूक लढण्याचा विचार केलेला नाही. मात्र, जर कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि माझ्या आयुष्यात निवडणूक लढावी अशी परिस्थिती आली, तर मी नक्कीच धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीतून आमदारकीची निवडणूक लढेन. नवरा विरुद्ध बायको लढत होईल, असं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, “माझ्यावर न्यायालयाने आमच्या वैयक्तिक प्रकरणात काहीही भाष्य करण्यास निर्बंध लावले आहेत. त्यामुळे मी सध्या बोलत नाहीये. मात्र, हे निर्बंध उठवल्यानंतर मी माध्यमांना जाहीर न केलेल्या अनेक गोष्टी सांगणार आहे. अभी तो पिक्चर बाकी है, असंही करुणा मुंडेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“गायब असलेले नितेश राणे अखेर दिसले कॅमेऱ्यात; राणेंना पाहण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी”
मुंबई बँक निवडणुकीत प्रविण दरेकरांना झटका?; मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व