Home महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना लागलेली ‘ही’ सवय लवकर जाईल; रोहित पवारांचा टोला

भाजपच्या नेत्यांना लागलेली ‘ही’ सवय लवकर जाईल; रोहित पवारांचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शरद पवार हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल भाजपकडून करण्यात येत आहे. त्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवारांनी जोरादार प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : …याला म्हणतात कॅप्टन्सी; विराट कोहलीनं शमीमध्ये जोश भरला आणि त्यानंतर शमीनं असं काही केलं की…

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना सुध्दा पवार साहेब जनतेमध्ये मिसळून त्यांची मदत करताना दिसतात.कोरोनाच्या काळात एकही दिवस घरी न बसता त्यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात आधार दिला. भाजपच्या नेत्यांची अशी राजकीय वक्तव्य करण्याची पद्धत ही आताची नाही, तर ती फार जुनी आहे. ही भाजपच्या नेत्यांना लागलेली सवय लवकर जाईल अशी काही चिन्हं दिसत नाहीत, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

मागील दोन वर्षात कोरोनाच्या काळातही इतकं वय झालेला असताना सुध्दा शरद पवारांनी आराम केला नाही. तर प्रत्यक्ष जनतेत मिसळून त्यांना सहकार्य केलं आहे, आणि जनतेच्या मनात असलेली भीती त्यांनी दूर केली. शरद पवार साहेबांवरती भाजपकडून वारंवार अशा पध्दतीची टीका केली जाते. पण त्यांच्या टीकेत काहीचं अर्थ नसतो हे जनतेला सुध्दा माहित आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

“मुख्यमंत्री ऑन फिल्डच, ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधलीये त्याला काय करावं”

“मुख्यमंत्री ऑन फिल्डच, ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधलीये त्याला काय करावं”

“औरंगाबादमध्ये मनसेची जोरदार मोर्चेबांधणी, शहरात दोन नव्या शाखांची स्थापना”