आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबईचा विकास आराखडा मंजूर कराताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. परंतू मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे आता उद्यानं आणि खेळाचे मैदान पूर्णपणे नामशेष झाले आहेत, असा आरोप करत भाजप आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.
हे ही वाचा : कोरोनाचा विषाणू नष्ट करण्यासाठी पुणेकरांने बनवलं अजब यंत्र
मुंबई महापालिका अजमेरा बिल्डरवर मेहेरबान आहे. मुंबई शहरातील उद्यानांसाठी असणारी जागा महापालिकेनं अजमेरा बिल्डरला दिली आहे. त्या बदल्यात बफर झोनमध्ये असणारी लँड लॉकिंग जागा जी विकासासाठी अनुकूल नाही ती ताब्यात घेतली आहे. यात सरळ सरळ 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असं योगेश सागर म्हणाले आहेत.
दरम्यान, हा निर्णय मागे घेतला नाही तर या विरोधात भाजप आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशाराही सागर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
खुर्चीत गांजा मारून कोणालाही बोलता येते, पण…; शिवसेनेचा किरीट सोमय्यांवर निशाणा
विद्या चव्हाण-अमृता फडणवीसांच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती”