Home महाराष्ट्र सांगलीतील रुग्णाला वाचवता आलं नाही याची खंत- जयंत पाटील

सांगलीतील रुग्णाला वाचवता आलं नाही याची खंत- जयंत पाटील

सांगली : सांगलीतील विजयनगर भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. आज त्या रुग्णाचे दुर्दैवाने निधन झाले आहे. इस्लामपूरातील कोरोनाच्या रुग्णांना आपण सुखरूपपणे बाहेर काढले मात्र या रुग्णाला वाचवता आलं नाही याची खंत वाटते आहे. तसेच दुःख होत आहे, असं मंत्री जयंत पाटील म्हणाले.

शेवटच्या स्टेजमध्ये असताना त्या रुग्णाला कोरोना असल्याचे निदान झाले. रुग्णाला हृदयविकाराचाही त्रास होता. माझी सांगलीकरांना विनंती आहे की, आपल्याला कोरोनाची लक्षणं असेल तर ताबडतोब आपली तपासणी करून घ्या, आपण वेळीच त्यावर उपचार करू, अशी विनंती जयंत पाटील यांनी सांगलीकरांना केली आहे.

मी जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाशी चर्चा केली आहे. या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा आता शोध सुरू आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाईल तसेच परिसरही सील केला गेला आहे. सांगलीकरांनी दक्ष रहावं अशी माझी विनंती आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत- नारायण राणे

“पालघरमधील घटना ही लज्जास्पद; आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल”

“रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येतेय”

“मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे”