Home महाराष्ट्र ‘…तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांची टीका

‘…तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मलमत्ता  माफ करण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

हे ही वाचा : बीड जिल्हा परिषद निवडणुक; मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला

सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये 11 हजार कोटींची सुट दिलीत. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत. विदेशी दारुला करात 50 टक्के सुट दिलीत. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली. आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली, अशी टीका अशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान, आतापासूनच नाही तर वचन दिलेत त्या तारखेपासून 500 चौरर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा. अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं 500 चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा? 500 चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का?, असा सवालही शेलार यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चांदगाव येथील अनेक युवकांचा मनसेत प्रवेश”

“ठाकरे घराण्याची सून अंकिता पाटील ठाकरे कोरोना पाॅझिटिव्ह; लग्नसोहळ्यानंतर 4 दिवसात पाॅझिटिव्ह”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आदित्य ठाकरेंचं काैतुक, म्हणाले…