Home महाराष्ट्र बीड जिल्हा परिषद निवडणुक; मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला

बीड जिल्हा परिषद निवडणुक; मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असतं. बीडमध्येही सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीतील मंत्री धनंजय मुंडे या भावंडांत खरी लढत होणार असून दोन्ही भावंडांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

2015-16 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने जिल्हा परिषदेवर झेंडा रोवला होता. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाले आणि जिल्हा परिषद महाविकास आघाडी म्हणजे धनंजय मुंडेंच्या ताब्यात आली. आता दोन्हीही भावंडांचे लक्ष जिल्हा परिषदेवर लागलं आहे.

हे ही वाचा : “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चांदगाव येथील अनेक युवकांचा मनसेत प्रवेश”

भाजपने यासाठी मोर्चेबांधणीही सुरु केली असून मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात भटके विमुक्तांची संख्या मोठी आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीसह महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपकडून मोठे पाऊल उचलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून भटके विमुक्त आघाडी युवा मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षपदी सतीश भोसले यांची निवड करण्यात आलीय.

महत्वाच्या घडामोडी – 

“ठाकरे घराण्याची सून अंकिता पाटील ठाकरे कोरोना पाॅझिटिव्ह; लग्नसोहळ्यानंतर 4 दिवसात पाॅझिटिव्ह”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आदित्य ठाकरेंचं काैतुक, म्हणाले…

“अमूल डेअरीवर मनसेचा धडाका; अमूल डेअरी कामगारांना मनसे नेते अविनाश जाधवांनी दिला न्याय”