Home महाराष्ट्र नितेश राणे प्रकरणावरून बॅनरबाजी; “नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास एक कोंबडी...

नितेश राणे प्रकरणावरून बॅनरबाजी; “नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे आता नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे गायब आहेत. या प्रकरणावरुन  पोस्टरबाजी करण्यात येत आहे.

हे ही वाचा : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; जिंकल्या 19 पैकी 10 जागा

नितेश राणे यांच्याबाबत मुंबईत चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पोस्टर लावले आहेत. बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून ते हरवले असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असंही लिहिण्यात आलं आहे. नितेश राणेंबाबत लावलेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान,  हे बॅनर कोणी लावले आहे, याबाबत त्यावर काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे बॅनर कोणी लावले, याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

शिवसेनेत पक्षप्रवेशाचं वादळ; अनेक युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”