आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाची तत्कालीन परिस्थिती तसेच भाष्य करताना माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढलं होतं असं सांगितलं, यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेला कसं बनवलं, हे स्वतःच सांगितलंय. ‘माझ्या एका वाक्याने भाजपा-शिवसेनेत दुरावा निर्माण झाला,’ असं ते म्हणालेत. खरं तर त्यांनी मी शिवसेनेला भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसायला कसं भाग पाडलं, असं म्हणणं अधिक संयुक्तिक झालं असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “…अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”; एसटी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
“देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची मदत हवी असेल तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करु, असं मी त्यावेळी म्हणालो होतो. ते माझं एक वाक्य शिवसेना तसेच भाजपमध्ये अंतर वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरलं,” असं शरद पवार म्हणाले होते.
अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा @PawarSpeaks यांनी शिवसेनेला कसं बनवलं, हे स्वतःच सांगितलंय. ‘माझ्या एका वाक्याने भाजपा-शिवसेनेत दुरावा निर्माण झाला,’ असं ते म्हणालेत. खरं तर त्यांनी मी शिवसेनेला भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसायला कसं भाग पाडलं, असं म्हणणं अधिक संयुक्तिक झालं असतं.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 30, 2021
महत्वाच्या घडामोडी –
भाजपच्या ‘या’ निलंबित आमदाराने लग्न समारंभात केला भन्नाट डान्स; व्हिडीओ प्रचंड व्हायरल
“कन्येच्या लग्नसोहळ्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण”