Home देश “सर्वसामान्यांना मिळाला दिलासा; पेट्रोलच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी झाली घट”

“सर्वसामान्यांना मिळाला दिलासा; पेट्रोलच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी झाली घट”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईनं सर्वसामान्य जनता त्रासली आहे. अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरामुळं सर्वसामान्य लोकांचं हाल होत आहेत. अशातच आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मोठी घोषणा केली आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेत इनकमिंग सूरूच; ‘या’ माजी महापाैराच्या पुत्रानं हाती बांधलं शिवबंधन”

पेट्रोल लिटरमागे 25 रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा हेमंत सोरेन यांनी केली आहे. हेमंत सोरेन यांच्या या घोषणेमुळं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सोरेन यांनी यासाठी काही अटी घातल्या आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्याचा सर्वाधिक फटका गरीब आणि मध्यमवर्गीयांना बसत आहे. त्यामुळे सरकार राज्यस्तरावरून दुचाकी वाहनांसाठी पेट्रोलवर ₹ 25 चा सवलत देणार आहे, त्याचा फायदा 26 जानेवारी 2022 पासून सुरू होईल., असं सोरेन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या नागरिकांना मोटारसायकल आणि स्कूटरसाठी हे स्वस्त पेट्रोल मिळणार आहे. राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“शिवसेनेत इनकमिंग सूरूच; ‘या’ माजी महापाैराच्या पुत्रानं हाती बांधलं शिवबंधन”

“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांची नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश”

“खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती”