Home महाराष्ट्र केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांची नोटीस; यावरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांची नोटीस; यावरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेत इनकमिंग सूरूच; ‘या’ माजी महापाैराच्या पुत्रानं हाती बांधलं शिवबंधन”

यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठं आहेत, असा सवाल केला होता. तेव्हा राणेंनी, हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. यावरून आता सिंधुदुर्ग पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नारायण राणेंच्या मागे भाजप खंबीरपणे उभे आहे. राज्यात पोलिसांना दरोडेखोर, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ मिळत नाही. मात्र घरावरती जाऊन नोटिसा चिकटवतात हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, याचा मी निषेध करतो, असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांची नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश”

“खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती”

मुख्यमंत्रीपदाचा हंगामी का होईना, ताबा मिळाला, त्यासाठी शुभेच्छा; मनसेचा अजित पवारांना टोला