Home महाराष्ट्र आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचं विधीमंडळांच हिवाळी अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनात चर्चा कमी व गोंधळ जास्त बघायला मिळत आहे. या अधिनेशनाचं आज शेवट देखील गोंधळात झाला. विरोधकांच्या गोंधळातच विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर झालं. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : तुम्हांला ‘ते’ जमलं नाही, निदान नाच्याचं काम तरी चांगलं करा आणि नाव कमवा; भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार

आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुटं सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे हे आज सिद्ध झालं., अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली.

दरम्यान, विधानसभेत विद्यापीठाच्या कायद्यावर चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक, ठरवून चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेऊन चर्चा न करता, हे विधेयक मंजूर करून घेण्याचं पाप आज सरकारने केलं आहे. दुर्दैवाने या पापामध्ये विधानमंडळाचं सचिवालय देखील पूर्णपणे सहभागी असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे., असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

महाविकास आघाडी सरकारमधील ‘इतके’ आमदार नाराज; बावनकुळेंनी केला खुलासा

“12 निलंबित आमदारांवरून अजित पवारांचा भाजपला टोला, म्हणाले… कारवाई करा, पण…”

“कट्टर शिवसैनिक सुमंत रूईकरच्या कुटूंबाला शिवसेनेतर्फे 5 लाखांची मदत, तसेच कुटूंबाची घेतली जबाबदारी”