Home महाराष्ट्र “कट्टर शिवसैनिक सुमंत रूईकरच्या कुटूंबाला शिवसेनेतर्फे 5 लाखांची मदत, तसेच कुटूंबाची घेतली...

“कट्टर शिवसैनिक सुमंत रूईकरच्या कुटूंबाला शिवसेनेतर्फे 5 लाखांची मदत, तसेच कुटूंबाची घेतली जबाबदारी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या दिर्घायुष्यासाठी पायी तिरूपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू झाला आहे. शिवसैनिक सुमंत रूईकर हे मुख्यमंत्री उद्दव ठाकरेंना दिर्घायुष्य लाभावे यासाठी पायी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघाले होते. मात्र वाटेतच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर आता शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रूईकर कुटूंबियाच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं.

हे ही वाचा : “वडिलांच्या खांद्यावर बसूनही निलेश राणेंची अजित पवारांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही”

बीड येथे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन चंद्रकांत खैरेंनी त्यांना आधार दिला. तसेच यावेळी रुईकर कुटूंबियांना शिवसेनेतर्फे 5 लाखांची मदत करण्यात आली. यावेळी रुईकर यांच्या पत्नीला नोकरी, मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च शिवसेनेने उचलला आहे. शिवसेना लवकरच त्यांना पक्के घर देणार असल्याचंही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आपला कर्ता माणूस जरी गेला असेल तरी तुम्ही एकटे नाहीयत, तुमच्यासोबत उद्धवजी आहेत, संपूर्ण शिवसेना कुटुंब आहे, असं चंद्रकांत खैरेंनी यावेळी म्हटलं. तसेच शिवसेना पक्ष हा सदैव रुईकर कुटुंबियांच्या पाठीशी राहील, असं आश्वासनही चंद्रकांत खैरेंनी यावेळी रूईकर कुटूंबाला दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राणे साहेब तुमच्या मुलांना आवरा, अन्यथा तुमच्यासारखाच त्यांचाही राजकीय अंत होईल”

“मोठी बातमी! रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला, चालकासोबत शेतात पळ काढल्याने सुखरूप बचावल्या”

“माझ्यानंतर उद्धवला साथ द्या; विधानभवनात शेवटच्या भाषणात रामदास कदमांचा कंठ दाठला”