Home महाराष्ट्र ठाकरे सरकार करणार 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांची मदत

ठाकरे सरकार करणार 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांची मदत

मुंबई : करोनाच्या संकटकाळात या मजुरांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मजुरांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत.

करोनाग्रस्तांची देशातली संख्या लक्षात घेतली तर सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. या परिस्थिती बांधकाम कामगारांना आर्थिक अडचण सहन करावी लागत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, करोनासारखा संकट काळ समोर आलेला असताना बांधकाम मजुरांच्या खात्यात पैसे जमा केले जावे असा प्रस्ताव राज्याच्या कामगार विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला होता. त्यानुसार मदतीच्या स्वरुपात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयास मंजुरी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून?; निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल

टाटा ट्रस्ट करणार पुन्हा देशाची मदत; आता देणार ‘इतक्या’ रुपयांचा निधी

“उद्धव ठाकरेंविरुद्ध गुन्हा केव्हा दाखल होणार?; किरीट सोमय्यांचा सवाल”

लॉकडाऊनच्या काळात शालेय शुल्क भरण्याची सक्ती करू नये- वर्षा गायकवाड