आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या दिर्घायुष्यासाठी पायी तिरूपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू झाला आहे. शिवसैनिक सुमंत रूईकर हे उद्दव ठाकरेंना दिर्घायुष्य लाभावे यासाठी पायी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघाले होते. त्यांनी यासाठी 1100 किलोमीटर पायी चालण्याचा निश्चय केला होता.
सुमंत रुईकर हे त्यांच्या मित्रासोबत तिरूपती बालाजी निघाले होते. रोज 35 किलोमीटर चालून हा प्रवास करत होते. 31 डिसेंबरला त्यांना बालाजीला पोहोचायचं होतं. शनिवारी ते कडप्पापर्यंत पोहोचले होते. पण चालून चालून ते आजारी पडले होते. त्यावेळी त्यांच्या मित्रानी रुईकरांच्या घरी कळवलं. त्यामुळे घरच्यांनी त्यांना माघारी येण्याची विनंती केली होती. मात्र रूईकर हे माघारी जाण्यासाठी तयार नव्हते. शेवटी खूप समजावून सांगितल्यानंतर रूईकर माघारी येण्यासाठी तयार झाले.
हे ही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याची जीभ घसरली; म्हणाले…
ते कडप्पामधून रेल्वेत बसले होते. मात्र सोलापूर येण्याआधीच ते तेलंगणातील रायचूर स्टेशनवर उतरले आणि पुन्हा एकटेच तिरूपतीकडे निघाले. अंगात ताप असल्याने आणि शरीरात कसलाच त्राण न उरल्याने त्यांचा रायपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, रूईकर यांनी यापूर्वीही एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी तिरूपती बालाजीची पायी यात्रा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार देखील केला होता.
महत्वाच्या घडामोडी –
…म्हणून मी भाजप नेत्या मनेका गांधी यांची भेट घेतली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण
“ग्रामीण भागातही राज ठाकरेंची क्रेझ; अनेक कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
“पालकमंत्री असताना त्यांची अपूर्ण कामं करण्याची जबाबदारी आमच्यावर आली”