आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. यावरून मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवर भाजपने मुख्यमंत्रिपदाचा प्रभार कुणाला तरी द्यावा, अशी मागणी केली. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “भास्कर जाधव सोंगाड्या; काल राष्ट्रवादीचा होता, आज शिवसेनेचा आहे, उद्या भाजपचाही होईल”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे ते सभागृहात येऊ शकले नाही. पण ते कामकाजाकडे लक्ष ठेवून आहेत. अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसात सभागृहात येतीलही. पण पंतप्रधान तंदुरुस्त आहेत ते संसदेत का येत नाहीत?, असा सवाल संजय राऊतांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
आम्हीही पंतप्रधानांना संसदेत शोधत होतो. ते मला उत्तर प्रदेशात दिसले. परदेशात दिसले. पुतीन यांना मिठी मारताना दिसले. पण संसदेत दिसले नाही. संसद सुरू असते तेव्हा पंतप्रधानांनी संसदेत यावं असे संकेत आहेत. ती परंपरा आहे. पण पंतप्रधान येत नाहीत. मुख्यमंत्री दोनचार दिवसात येतीलही, पण पंतप्रधान का येत नाही?, असा सवाल संजय राऊतांनी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“नगरपंचायत, महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडीने मारली बाजी; भाजपला पराभवाचा धक्का”
“पडळकरांनी अजित दादांवर केेलेले आरोप म्हणजे, स्वत:ची किंमत वाढवण्यासाठी केलेला भाबडा प्रयत्न”
“…तर राष्ट्रपती राजवट स्वीकारून सगळाच कारभार केंद्राकडे द्या”