आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चावर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.
येत्या 23 तारखेला आमचा मोर्चा आहे. मात्र राज्य सरकार मुंबईमध्ये विनाकारण जमावबंदी लागू करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मुंबईत जमावबंदी लावण्याचे कोणतेही सबळ कारण दिसत नाहीये. सरकार कायद्याचा दुरुपयोग करून जनतेचा आवाज दाबणार असेल तर सरकारचा जमावबंदी आदेश झुगारून आम्ही मोर्चा काढू’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ते मीडियाशी बोलत होते.
हे ही वाचा : माझे 30-35 आमदार होऊ द्या, 10 मिनिटांत गंमत करून दाखवतो; महादेव जानकरांचं मोठं वक्तव्य
ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकार दोन्हीकडून ओबीसींची फसवणूक केल्या जात आहे. जातीनिहाय जनगणनेशिवाय सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित इम्पिरिकल डाटा देता येणार नाही व दोन्ही सरकार या बाबतीत गंभीर दिसत नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून ओबीसींच्या न्यायिक मागण्यांसाठी 23 डिसेंबर रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने मुंबईत जमावबंदी आदेश लागू केल्याने अधिवेशन काळात विविध मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलनाला रोखण्याचाच हा प्रयत्न आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“जिथे संकट तिथे शिवसेना, हा इतिहास आहे”
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना रावसाहेब दानवेंची जीभ घसरली, म्हणाले…