आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा मनसे-भाजप युती होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “नारायण राणे ज्या पक्षात जातात, त्यांची सत्ता जाते, त्यामुळे भाजपलाही धोका होऊ शकतो”
युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणता. तुमचा सोर्स काय हे समजत नाही. युतीच्या चर्चा सुरू असतील. पण त्याबाबत मला काहीच माहीत नाही., असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र पुणे दाैऱ्यात राज यांनी कसबा विधानसभेच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी भेट दिली. यावेळी टिळक कुटुंबीयांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले.
दरम्यान, राज यांनी दिलेल्या या भेटीमुळं पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीविषयी राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
निवडणूक आल्यानंतर उसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला
“रूपाली पाटील यांच्या राष्ट्रवादीत येण्यानं रूपाली चाकणकर नाराज?”
“…तर सोडायचं नाही”; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना बजावलं