Home जळगाव नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, तेवढी त्यांची उंची नाही- गुलाबराव...

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, तेवढी त्यांची उंची नाही- गुलाबराव पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून प्रतिक्रिया देत भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

हे ही वाचा : “…तर सोडायचं नाही”; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना बजावलं

उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे. शिवसैनिकांनी या घटनेतून बोध घ्यायला पाहिजे, अशी टीका नितेश राणेंनी केली होती. यावरून आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनीच नारायण राणे यांना राजकारणात आणले, राजकारणात मोठे केले. शिवसेनेमुळे ते मोठे झाले. त्यामुळे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत बोलताना विचार करावा. नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंबाबत बोलण्याएवढी उंची नाही, असं जोरदार प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी नितेश राणेंच्या टीकेला दिलं. ते जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

बेस्टच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यापासून सत्ताधाऱ्यांचा पळ; भाजपाचा शिवसेनेवर निशाणा

“माझे महात्मा गांधी फक्त आणि फक्त राज ठाकरे”

“अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन, अमित शहांच्या मुक्कामासाठी स्वत:चा कोट दिला”