आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी महाराजांचं साम्राज्य आणि हिंदुत्वाबद्दल वक्तव्य केलं होतं.
हे ही वाचा : मनसेचा मोठा निर्णय; रूपाली पाटलांनी राजीनामा दिल्यानंतर महिला संघटना नियुक्तीस प्राधान्य”
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही. त्यांनी शंकराची पूजा केली आणि हिंदू धर्माची पूजा केली. कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यानंतर चंद्रकात पाटलांवर टीका होता आहे. यावरून आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. शिवराय, फुले, शाहुंच्या महाराष्ट्राला धर्मांद बनवण्याचा प्रयत्न पाटील यांनी चालवला आहे. चंद्रकांत पाटील हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस आहेत,, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.
दरम्यान, महाराजांच्या अंगरक्षकांमध्येही अनेकजण मुस्लीम होते. मौलाना हैदर अली महाराजांच्या गुप्तचर खात्यात होते तर इब्राहिम खान शस्त्रागाराची जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू व्होट बँकेशी जोडून चंद्रकांत पाटील यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा आणि इतिहासाचा चुकीचा अर्थ लावून व विकृतीकरण करून लोकांची दिशाभूल करू नये, असंही लोंढे यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
हम तो शेर पर एहसान किया करते है, हम चुहे पे कभी एहसान नही करते; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांना टोला
आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल; नारायण राणेंचा विश्वास
“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरें केलं मनसैनिकाच्या बाळाचं नामाकरण”