Home महाराष्ट्र वांद्र्यामधील घटना पूर्वनियोजित होती- किरीट सोमय्या

वांद्र्यामधील घटना पूर्वनियोजित होती- किरीट सोमय्या

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर वांद्रे स्थानकाबाहेर परप्रांतीयांनी हजारोंच्या संख्येनं गर्दी केली. यावर ही घटना पूर्वनियोजित होती, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मंगळवारी वांद्र्यात जी घटना घडली त्याचा एक व्हिडीओ आला आहे. तो मी मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलाय. यामध्ये दोन तरूणांचं संभाषण आहे. यामध्ये ते पोलीस कुठे आहेत. मीडिया कुठे आहे, असं विचारताना दिसत आहेत. तसंच सर्वांना सांगा आम्हाला गावी जायचं आहे. अन्यथा 15 हजार रूपये रोख द्या. याचा अर्थ ही घटना पूर्वनियोजित होती, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना शरद पवारांनी केली ‘ही’ विनंती

“महाराष्ट्र सरकार गांभीर्याने आणि धैर्याने करोनाचा सामना करतंय”

उद्धव ठाकरेंनी मानले भिम सैनिकांचे आभार; म्हणाले…

अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले…