आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होट बँक तयार केली. त्यावर अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनी कळस चढवला, असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत आज स्पष्टीकरण देतानाही पाटील यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे.
मी म्हणालो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली. त्याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम मशीन घेऊन तयार केली. तर त्यांनी जनमत तयार केलं. त्यात चुकीचं काय? याच वक्तव्याला घेऊन कुणीतरी निदर्शनं करणार होतं. मला धमकी आली, मात्र, हम किसीको टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे ही वाचा : रूपाली पाटलांनंतर बाळा नांदगावकरही पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा; बाळा नादंगावकर म्हणतात…
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही. त्यांनी शंकराची पूजा केली आणि हिंदू धर्माची पूजा केली. कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो, असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 14, 2021
महत्वाच्या घडामोडी –
ओबीसी आरक्षण कायमचं गोठविण्याचा ठाकरे सरकारचा कट; भाजपचा आरोप
‘बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा, म्हणाले…
रोहित पाटलांच्या ’25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले…